An Impromptu History of Dreams
- janhviwaman
- Jul 24, 2023
- 14 min read
Imagine this, It’s winter in 1862 and you have to tackle one of the most significant challenges in the world of chemistry. The problem is the structure of benzene. Benzene is a smelly and highly flammable hydrocarbon molecule, all hydrocarbons are made of hydrogen and carbon, but in Benzene, the ratio of these elements is a little weird. Usually, there are more hydrogen atoms than carbon in a hydrocarbon, but they are both 6-6 in benzene.
What strange molecular structure could fit these atoms together? You are now frustrated and decide to take a nap. As you sleep, the vision of atoms and molecules dance in your brain. All of a sudden these turn into a series of snakes, then suddenly a snake coils around itself as if it was biting its tail, forming the symbol of the ouroboros. And kaboom! You’ve solved the mystery of the chemical structure of benzene…in your dream!
This is exactly what happened with August Kekulé in 1862, and completely changed the future of organic chemistry in the process. a contribution to science that earned him a statute, All this happened when he was asleep….all thanks to a dream!
The molecular shape is one of history’s most famous dreams. And it makes us wonder: Why do we dream? But for most of us, dreaming is about more than making chemistry discoveries. Humans have been trying to figure out why we dream for thousands of years, probably as far back as we’ve been asking questions, and since it’s an experience we only have while we’re asleep, it’s a particularly tough question to answer. But going back to the Greek philosopher, Plato and the Confucian scholar Zhu Xi: great minds have speculated about the function and meaning of dreams, but it’s been in the last few decades that scientific experiments have started to show us what benefits our nocturnal narratives can have.
Scientists think that dreams might have many functions that influence our success, our smarts, and even our survival. We each spend about two hours dreaming every night. Over an 80-year lifetime, that’s almost 60,000 hours or the same as ten years of walking life! Dreaming clearly must have some benefits, otherwise, we wouldn’t spend so much time doing it, and everyone dreams. Even if we don’t always remember them, you are most likely to remember your strangest ones…. one time I had this dream where Tom Hiddleston and I were rowing a boat across the ocean and we got hit by a storm, and we were eating sandwiches. That was weird!
Almost half of us remember at least one dream a week, and women are more likely to remember their dreams daily compared to men. There are many phases the brain goes through during sleep, these phases are repeated in cycles throughout the night. In the first phase, we transition from wakefulness into sleep, as you begin to relax and your breathing slows, your body temperature drops and your breathing slows down even more: you enter light sleep.
After that, you enter the deep sleep phase, which is characterized by a particular pattern in your brain called delta waves. After that, you start the REM or ‘Rapid eye movement sleep stage. Your breathing gets faster, and your eyes move all over. REM is when dreaming happens. And throughout this phase, your brain is very active-almost as active as if you were awake. Almost all other animals like whales, wombats, and wildebeest sleep, and they also experience REM sleep. So scientists think that many of these animals also dream, this includes cats and dogs(probably about chasing a bright red ball or chewing a bone).
The way we think about dreams has changed a lot throughout history. In most cultures around the world, dreaming has to hold spiritual significance. There are even dream interpretations in the bible. But decoding dreams was most popular in Egypt. The Egyptians created volumes of books full of common dreams and their supposed meanings. Professional dream interpreters used these books to help people figure out what their dreams meant.
Dreamer: “ I had a dream that my leg came off! ”
Interpreter: “Oof! That means dead people are judging you ”
Dreamer: “ Yikes! ”
Dreamer: “I dreamed that I would die violently! ”
Interpreter: “Oh, that’s great! ”
Dreamer: “Really? ”
Interpreter: “ Really, it means you’ll live a long life ”
Dreamer: “Okay? ”
Dreamer(beaming): “I had a dream that I pored a jug of my pee into the Nile ”
Interpreter(confused): “ Really? ”
Dreamer: “Yep! ”
Interpreter: “Well that’s a good omen too, it means you will have a bountiful harvest “
The belief that dreams have hidden messages to be interpreted or decoded remained the dominant way to look at dreams through the first part of the 20th century. In 1900, Sigmund Freud published the influential book “Interpretation of Dreams”, in it he claimed that dream interpretation could be used to understand unconscious desires. It all started when he had a dream, a dream so famous that it has a name and a Wikipedia page. It is called Irma’s Infection, “ a large hall – numerous guests, whom we were receiving – Among them was Irma”. This dream was about a former patient of Freud’s he felt he wasn’t able to completely heal because she refused his treatment. This dream sparked Freud’s theory that our wishes that aren’t fulfilled while we’re awake are expressed in our dreams. Because these dream wishes might be embarrassing, Freud thought our minds deliberately confused the dreams to hide their true meaning.
Modern science has moved away from Freud and viewing dreams as buried messages to decode or interpret. Today researchers are asking what function and benefits our brains themselves might get from dreaming. At first, scientists believed that the strange mish-mash of pictures, stories, and events we experience while dreaming were just side effects of basic biological processes in our brains, a sort of neurological noise that we experience as we sleep. Scientists thought that other parts of the brain tried to make sense of the noise by threading this random slideshow into a story, often a very weird one. This is called the Activation-Synthesis Theory of dreaming. But experiments showed that dreams are not random, some things are more likely to appear in our dreams than others, and scientists began to wonder: maybe dreams aren’t random..maybe our brains need to dream to be healthy…What we dream about often has to do with what we do while we’re awake especially if we are learning something new. In one study, about a third of participants who played Alpine Racer, an arcade downhill skiing simulator, had dreams about the game…
Consider this: The things that happen to you every day only happen once. In our short-term
memory, these experiences are fragile, and can easily disappear. Our daily experiences
might only make it into our long-term memory if they’re re-played several times, and this happens in our dreams. Patterns of brain activity just after dreaming look a lot like
when our brains store and retrieve episodic memories – memories of things that
happen to us. So, dreams may be a sort of memory replay of our experiences( with
an extra layer of weirdness on top just to make it fun I guess.)
In one study to test this, scientists asked people to play 7 hours of Tetris across 3
days. After some serious Tetris time, participants reported seeing images of tetrominoes when falling asleep. They seemed to be replaying the game to store their new skills in long-term memory. It’s not all fun and games, though. Dreams can turn into nightmares. There’s no universally accepted definition of what a “nightmare” is, but they’re commonly considered a “distressing or terrifying dream,” one that goes so far as to wake you up. About one in 40 dreams is a nightmare. So why do our brains replay our worst fears and memories?
The Threat-Simulation Theory suggests that dreams let us “practice” dangerous events and situations. That’s why some people relive traumatic experiences in dreams. The brain is trying to condition us to survive threatening experiences by “practising” in a safe environment — inside our sleeping brain.
Back when life-threatening situations were a part of our species’ everyday life, simulating threats could’ve helped us survive. But in the modern world, reliving awful situations in chronic nightmares can be debilitating. But we also practise social situations in dreaming. That’s the Social Simulation Theory of dreams. Scientists noticed our dreams are heavy on social situations: a fight with a close friend, a clash with a coworker, or not wearing pants to school. Since being social is so important to our species, practising these situations would have been an evolutionary advantage.
The strange experience of dreaming can be used for problem-solving too. Novelist John Steinbeck once said: “It is a common experience that a problem difficult at night is resolved in the morning after the committee of sleep has worked on it.” When college students were given a homework problem to focus on each night before bed, a quarter dreamed the answer within a week. Because dreams aren’t limited by logic or physics they’re a great place to problem solve and come up with creative — and sometimes weird — solutions. This is especially helpful when solutions to problems need a very different approach compared to conventional wisdom. And this may be why we owe many pieces of great art to dreams: The Beatles’ iconic song Yesterday, Salvador Dali’s melting clocks, Mary Shelley’s novel Frankenstein, and countless others.
So, can you dream your way to a Nobel Prize? Or a Grammy? Scientists are experimenting with “Dream Incubation” as a way to prime the brain before sleep to be more creative. And because dreaming is so common, and because we spend so much of our lives doing it, it’s almost certainly useful, for one or many reasons.
But why did dreaming evolve, to begin with? Maybe thanks to the… rotation of our planet? Scientists think the origin of dreaming just might have to do with the sheer amount of time that humans – and all animals – spend in the dark. Our ability to use our peepers and see the world around us is an extremely important evolutionary advantage. And because it’s so important, the part of the brain responsible for sight, called the visual cortex, takes up a big chunk of our brains. But here’s the thing. Our brains can also be rewired pretty easily. If you were blindfolded, your brain would begin to change within an hour of not using your sight. The neurons of the visual cortex start being taken over for other tasks. The lengthy darkness of nighttime would have meant that the visual cortex of our human ancestors was at a high risk of being taken over by other functions while we slept. If we didn’t use it, we could lose it.
Dreams, and their highly visual nature, may have evolved in mammals to keep these vulnerable brain areas active at night… And keep the brain from rewiring itself in unfortunate ways. So… which is it? Is it problem-solving, or practicing, or seeing, or is it problem-solving or not about seeing, or a bit about practicing and a pinch of problems solving? Scientists don’t know if one or many of these ideas will prove to be correct, so research continues. It’s even possible that dreams may have evolved for one function, but stayed around so long because dreaming ended up helping us in a bunch of other different ways. Trying to peer into the workings of the sleeping brain is one of the most challenging problems in psychology and neuroscience, but we’re building a fuller and fuller picture of the science of dreaming, one dream …at a time.
Dreamer: “You wouldn’t believe the dream I just had.”
----------------------------------------------------------------------------------------
स्वप्नांचा उत्स्फूर्त इतिहास
वर्ष 1962 – रसायन शास्त्रातील एका अद्भुत आव्हानाचा विचार करत तुम्ही शेकोटी समोर बसलेले आहात. समस्या आहे बेंझिन संरचनेची. बेंझिन हा एक दुर्गंधीयुक्त आणि अत्यंत ज्वलनशील हायड्रोकार्बन रेणू आहे. सर्व हायड्रोकार्बन्स हे हायड्रोजन आणि कार्बनपासून बनलेले आहेत. परंतु, बेंझिनमध्ये या घटकांचे प्रमाण थोडे विचित्र आहे. सामान्यतः हायड्रोकार्बनमध्ये कार्बनपेक्षा जास्त हायड्रोजन अणू असतात, परंतु ते प्रमाण बेंझिनमध्ये सम-समान आहे (6-6).
आता या अणूंना कसा एकत्र बसवायचा आणि बेंझिनची आण्विक रचना करायची? जरा विचित्रच नाही का?
तुम्ही हताश होऊन एक छोटी झोप काढायची ठरवली, आणि जराशी झोप लागली न लागली , तुमच्या डोळ्यासमोर अणू- रेणु नाचू लागले, आणि अचानक ते स्वतःभोवतीच स्वतःला गुंडाळू लागले आणि एखाद्या सर्पासारखा स्वतःच्याच शेपटीचा चावा घेऊ लागले अगदी अष्टकृती सर्पा सारखे, दचकून तुम्ही उठला, चमत्कार घडला! बेंझिनच्या रासायनिक संरचनेचे रहस्य सुटले.
१८६२ मध्ये ऑगस्ट केकुले सोबत असेच काहीतरी घडले आणि या एका स्वप्नाने सेंद्रिय रसायनशास्त्राचे भविष्य पूर्णपणे बदलून टाकले. विज्ञानातील या योगदानामुळे त्याला एक ओळख मिळाली. हे सर्व तो झोपेत असताना घडले. सर्व काही एका स्वप्नामुळे! इतिहासातील एक प्रसिद्ध स्वप्न म्हणजे मॉलिक्युलर शेप (आण्विक आकार).
आपल्याला नेहमी आश्चर्य वाटते की आपल्याला ही स्वप्ने का बरं पडतात आणि कशामुळे पडतात. परंतु, आपल्यापैकी बहुतेकांसाठी स्वप्न पाहणे हे रसायनशास्त्राचा शोध घेण्यापेक्षा बरंच वेगळं असत. मानव हजारो वर्षांपासून स्वप्न का पाहतो हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. प्रश्न तर खूप जुना आहे आणि अनुभव फक्त झोपेतच मिळत असल्याने याचे उत्तर शोधणं थोड अवघड असावं. स्वप्न कशी पडतात आणि त्याचा अर्थ काय होतो याचं अनुमान ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो आणि कन्फ्यूशियन विद्वान झू शी यांनीही लावायचा प्रयत्न केला आहे. परंतु गेल्या काही दशकांमध्ये वैज्ञानिक प्रयोगांनी आपल्याला आपल्या या स्वप्नकथांचे काय फायदे होऊ शकतात हे दाखवण्यास सुरुवात केली आहे.
शास्त्रज्ञांच्या मते स्वप्ने आपल्या यशावर, जगाकडे पाहण्याच्या दृष्टीकडे आणि आपल्या जगण्यावरही प्रभाव टाकतात. आपण रोज दोन तास स्वप्ने बघण्यात घालवतो. सरासरी ८० वर्षाच्या आयुष्यात आपण ६० हजार तास किंवा १० वर्ष स्वप्न बघण्यात घालवतो. आपल्याला फायदेशीर असल्याशिवाय का आपण आयुष्यातील साधारण साठ हजार तास स्वप्नात व्यतीत करतोय? आपल्याला सगळी स्वप्नं लक्षात राहत नाहीत पण प्रत्येकाला पडलेले एखादे विचित्र स्वप्न नक्कीच लक्षात असते. मी पण एकदा टॉम हिडलस्टन बरोबर समुद्रात बोट चालवत होते, आम्हाला वादळाचा तडाखा बसला आणि आम्ही सँडविच खात होतो, विचित्रच ना!
आपल्यातील निम्म्या लोकांना दर आठवड्यात किमान एक तरी स्वप्न लक्षात राहते. पुरुषांपेक्षा स्त्रियांना त्यांची स्वप्ने दररोज आठवण्याची शक्यता जास्त असते. स्वप्नांच्या दरम्यान आपला मेंदू वेगवेगळ्या अवस्थांमधून जात असतो. या अवस्थांची रात्रभर पुनरावृत्ती होत असते.
पहिल्या अवस्थेत, आपण जागृत अवस्थेतून झोपेत संक्रमण करतो. जसजसे तुम्ही शांत होत जाता तसे तसे तुमचा श्वास मंदावतो, तुमच्या शरीराचे तापमान कमी होते आणि तुमचा श्वास आणखी कमी होतो . तुम्ही हलक्या झोपेत प्रवेश करता. त्यानंतर तुम्ही गाढ झोपेत प्रवेश करता. या वेळी मेंदू डेल्टा लहरी उत्सर्जित करतो. REM (Rapid eye movement) ही त्यानंतर ची अवस्था. याच REM अवस्थेमध्ये आपल्याला स्वप्न पडतात. मेंदू अगदी जागृत अवस्थे इतकाच सक्रिय असतो. प्राणीही REM अनुभवतात जसे की देवमासा (व्हेल), वोंबॅट आणि म्हणूनच शास्त्रज्ञांना असे वाटते की यापैकी बरेच प्राणी देखील स्वप्न पाहत असावेत. यामध्ये मांजर आणि कुत्रे यांचाही समावेश होतो (कदाचित चमकदार लाल चेंडूचा पाठलाग करणे किंवा हाड चघळणे अशी काही स्वप्न त्यांना पडत असतील ना?).
आपली स्वप्नांकडे पाहण्याची नजर आणि विचार करण्याची पद्धत यामध्ये इतिहासात बदल होत गेले. जगभरातील बहुतेक संस्कृतींमध्ये स्वप्न पाहण्याचे आध्यात्मिक महत्त्व आहे. बायबलमध्ये स्वप्नाचे स्पष्टीकरण देखील आहे. परंतु स्वप्नांचे अर्थ शोधणे इजिप्तमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आहे. इजिप्शियन लोकांनी स्वप्ने आणि त्यांच्या कथित अर्थांनी भरलेली पुस्तके तयार केली. अगदी व्यावसायिकांनी पण या पुस्तकांचा उपयोग करून लोकांना त्यांच्या स्वप्नांचा अर्थ शोधण्यात मदत केली.
स्वप्न पाहणारा: “ मला एक स्वप्न पडले की माझा पाय गळून गेला! “
इंटरप्रीटर: “अरे! म्हणजे मृतात्म्याची तुमच्यावर नजर आहे तर!”
स्वप्न पाहणारा: “अरेरे! “
स्वप्न पाहणारा: “मला स्वप्नामध्ये हे पण दिसले की मी वाईट पद्धतीने मरतो! “
इंटरप्रीटर: “हे चांगले स्वप्न आहे!! “
स्वप्न पाहणारा: “खरंच? “
इंटरप्रीटर: “खरोखर, याचा अर्थ तुम्ही दीर्घायुषी व्हाल”
स्वप्न पाहणारा (हसून): “मला एक स्वप्न पडले आहे की मी माझी तांब्याभर लघवी नदीमध्ये टाकली”
इंटरप्रीटर: “खरंच? “
स्वप्न पाहणारा: “होय! “
इंटरप्रीटर: “बरं, हे देखील एक चांगले शकुन आहे. याचा अर्थ असा आहे की यंदा शेतात भरपूर पीक येईल.”
२० व्या शतकाच्या सुरवातीला स्वप्नांमध्ये लपलेले अर्थ असतात अशी मान्यता होती आणि त्याचा अर्थ शोधण्याकडे लोकांचा अधिक कल होता.सन १९०० मध्ये, सिग्मंड फ्रॉइडने “Interpretation of Dreams” हे प्रभावी पुस्तक प्रकाशित केले, त्यात त्यांनी असा दावा केला की स्वप्नांच्या अर्थाचा उपयोग आपल्या सुप्त इच्छा समजून घेण्यासाठी केला जाऊ शकतो. हे सर्व सुरू झाले जेव्हा त्याला एक स्वप्न पडले. हे स्वप्न इतके प्रसिद्ध आहे की त्याचे विकिपीडिया पेज सुद्धा आहे. “Irma’s Infection” – “एक मोठा हॉल – असंख्य अतिथी, ज्यांचे आम्ही आदरातिथ्य करत होतो – त्यापैकी एक इरमा होती”. इरमा ही फ्रॉइडची एका रुग्ण होती जिला तो पूर्णपणे बरा करू शकला नाही कारण तिने उपचारांना नकार दिला होता. या स्वप्नामुळे फ्रॉइडच्या सिद्धांताला चालना मिळाली, आपल्या ज्या इच्छा आपण जागृत असताना पूर्ण होत नाहीत त्या आपल्या स्वप्नांमध्ये व्यक्त केल्या जातात. स्वप्नांमध्ये व्यक्त झालेल्या इच्छा काहीवेळा संकोच निर्माण करणार्या असू शकतात, म्हणूनच फ्रॉइडला वाटले की आपले मन जाणूनबुजून स्वप्नांचा खरा अर्थ लपवण्यासाठी आपल्याला गोंधळात टाकत असावे.
आधुनिक विज्ञान डॉ. फ्रॉइड व त्यांच्या स्वप्नांकडे गुप्त संदेश शोधण्याच्या दृष्टीकोनापासून दूर गेले आहे. आजच्या तज्ञांनी अभिप्राय दिला आहे की आपल्या मेंदूला स्वप्नांमधून कोणते कार्य आणि लाभ मिळतात हे पाहण्याची गरज आहे. सुरुवातीला, वैज्ञानिकांनी असा विश्वास वाटला की स्वप्नांमधील छान-खोटे चित्रे, कथा आणि घटना फक्त आपल्या मेंदूतील मूलभूत जैविक प्रक्रियांचे परिणाम आहेत, जे की आपण स्वप्नांत स्पष्टपणे अनुभवतो, एक प्रकारचा न्यूरॉलॉजिकल नॉइज म्हणता येईल. शास्त्रज्ञांच्या मते, मेंदूचे इतर भाग या नॉइजचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असावेत आणि या चित्रांना एकत्र गुंफून एक चलचित्र बनवत असावेत, बहुधा विचित्र चलचित्र. यालाच “स्वप्नाचा Activation-Synthesis सिद्धांत” म्हणतात. प्रयोगांनी असे दाखवून दिले की स्वप्ने रॅंडम नसतात. काही गोष्टी इतरांपेक्षा आपल्या स्वप्नांमध्ये दिसण्याची अधिक शक्यता असते. कदाचित आपल्या मेंदूला निरोगी राहण्यासाठी स्वप्ने पाहण्याची आवश्यकता आहे. आपण जी स्वप्ने पाहतो त्याबद्दल आपण जागृत असताना काय करतो याचा संबंध असतो, विशेषतः जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकत असतो. स्वप्नविषयक एका अभ्यासा दरम्यान असं आढळून आले की, अल्पाइन शर्यत (Alpine Racer, an arcade downhill skiing simulator) खेळणाऱ्या सुमारे एक तृतीयांश सहभागींना या खेळाबद्दल स्वप्ने पडली होती.
विचार करा: तुमच्यासोबत दररोज घडणाऱ्या गोष्टी एकदाच घडत असतात, आपल्या अल्पकालीन स्मृति मध्ये हे अनुभव क्षणिक असतात आणि आपण ते सहज विसरू शकतो. जर या गोष्टी वारंवार घडत असतील तर मात्र ते आपल्या दीर्घकालीन स्मृति मध्ये प्रवेश करतात, अशा गोष्टी आपल्या स्वप्नातही वारंवार दिसू शकतात. स्वप्नानंतर आपल्या मेंदूतील क्रियांचे जे पॅटर्न असतात ते स्मृतिची मालिका संग्रहित आणि पुनर्प्राप्त करण्यासारखे असते, आपल्यासोबत घडणाऱ्या गोष्टींच्या ह्या आठवणी असतात. स्वप्न हे अशाच आठवणीचा रीप्ले असू शकतो. थोड्या मनोरंजनासाठी या आठवणींमध्ये काही गंमतीदार संदर्भ जोडले जात असावेत.
टेट्रिस हा कोडे सोडवण्याचा मोबाइल गेम आहे, एका अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी लोकांना ३ दिवसात ७ तास टेट्रिस खेळण्यास सांगितले. चांगला भरपूर टेट्रिस खेळल्यानंतर लोकांनी टेट्रोमिनों चे चित्र रात्री स्वप्नात दिसल्याचे सांगितले. त्यांची ही नवीन कौशल्यं ते आपल्या दीर्घकालीन स्मृतीमध्ये साठवण्यासाठी ते गेम पुन्हा खेळत असावेत कदाचित.पण हे वाटतं तेव्हढे सरळ आणि मजेदार नाही, काही त्रासदायक किंवा भयानक स्वप्नामुळे दचकून उठावे लागते. साधारणत: चाळीस मधील एक स्वप्न भयानक असतं. (So why do our brains replay our worst fears and memories? )
The Threat-Simulation सिद्धांत असे सूचित करतो की स्वप्ने आपल्याला धोकादायक घटना आणि परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार करतात. म्हणूनच काही लोक स्वप्नात क्लेशकारक अनुभव अनुभवतात. आपण निद्रावस्थेत असताना सुरक्षित वातावरणात “सराव” करून मेंदू आपल्याला अवघड परिस्थितीमधये टिकून राहण्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न करतो. एक वेळ अशी होती की मनुष्य प्राणी नेहमीच मरणाच्या दारात उभा असायच्या त्यावेळी हे ठीक होत. पण आज तशी परिस्थिती नाही, आजच्या आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनात भयंकर स्वप्न पडत राहणे एखाद्याच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते.
स्वप्नांच्या Social Simulation सिद्धांतानुसार आपण स्वप्नात सामाजिक परिस्थिती हाताळायचा सराव करतो. शास्त्रज्ञांच्या असेही निदर्शनात आले की आपल्या जवळपासच्या सामाजिक परिस्थितीचा मोठ्या प्रमाणात स्वप्नांवर प्रभाव असतो जसे की जवळच्या मित्राशी अथवा ऑफिस मधील भांडण, किंवा अगदी शाळेत पॅन्ट ना घालण्याचे स्वप्न असो. माणूस हा समाजशील प्राणी असल्याने सामाजिक परिस्थिती हातळण्याच्या कसबीला चालना देणारे स्वप्न मनुष्याच्या विकासातही उपयोगी होऊ शकतात.
चमत्कारिक स्वप्न पाहून समस्या सुटल्याची अनेक उदाहरणे ऐकण्यात आहेत. कादंबरीकार जॉन स्टीनबेक एकदा म्हणाले होते “It is a common experience that a problem difficult at night is resolved in the morning after the committee of sleep has worked on it.”
एक प्रयोग म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी गृहपाठ म्हणून एका प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करण्यास सांगितले,एक चतुर्थांश लोकांना एका आठवड्यात उत्तर स्वप्न मध्ये सापडले. स्वप्नांना तर्क किंवा शास्त्र यांचं काही बंधन नसतं , त्यामुळे बऱ्याचदा समस्यांचे निराकरण करण्यासाठी, कृतिशील उपाय (कधी कधी विचित्र!) शोधण्यासाठी ते एक चांगले ठिकाण आहे. आणि यामुळेच कदाचित स्वप्नांमधून अनेक उत्कृष्ट कलाकृति साकारल्याची अनेक उदाहरणे आहेत. The Beatles या इंग्लिश रॉक बॅन्ड चे “Yesterday” हे गाणे, साल्वाडोर दाली यांचे अद्वितीय शिल्प(melting clocks), मेरी शेलीची Frankenstein ही कादंबरी अशी किती तरी उदाहरणे देता येतील.
मग आपण नोबेल किंवा ग्रॅमी पारितोषिक मिळवण्याचे स्वप्न पाहायला काय हरकत आहे? शास्त्रज्ञ “Dream Incubation” चा प्रयोग करत आहेत ज्यामुळे झोपेच्या आधी मेंदूला अधिक कृतिशील बनवता येईल. स्वप्न पडणे ही एक सामान्य बाब आहे आणि आपला बराचसा वेळ स्वप्न पाहण्यात जात असल्याने आपल्याला ते बऱ्याच कारणाने उपयुक्त असू शकते.
माणूस स्वप्न पाहायला कसा बरं लागला असेल? कदाचित पृथ्वीच्या गोल गोल फिरण्याला याचे श्रेय द्यावे लागेल! मानव आणि सर्व प्राणी अंधारात आपला भरपूर वेळ घालवत असतो, शास्त्रज्ञांना वाटते की स्वप्ने पाहण्याची उत्पत्ती यामुळेच झाली असू शकते. आपल्या दृष्टीने/डोळ्याने जग बघण्याच्या मानवाच्या क्षमतेचा या अत्यंत महत्त्वाचा उत्क्रांतीला फायदा झाला आहे.
दृष्टीसाठी जबाबदार असलेल्या मेंदूच्या भागाला visual cortex म्हणतात, आपला मेंदू सतत बदलत असतो आणि परिस्थितीशी जुळवून घेत असतो, या प्रक्रियेला neuroplasticity म्हणतात. जर तुमच्या डोळ्यांवर पट्टी बांधली असेल, तर तुमची दृष्टी वापरत नसल्याच्या तासाभरात तुमच्या मेंदू मध्ये बदल होऊ लागेल. visual cortex चे न्यूरॉन्स इतर कामांसाठी वापरले जाऊ लागतील. रात्रीच्या दीर्घ काळोखामुळे आपल्या मानवी पूर्वजांच्या visual cortex चे न्यूरॉन्स इतर कामांसाठी वापरले जाण्याचा धोका होता, आणि आपण ते वापरले नसते तर आपण त्यांना गमावून बसलो असतो.
स्वप्ने अत्यंत दृश्य स्वरूपाची असतात. रात्रीच्या वेळी असुरक्षित मेंदूच्या भागांना सक्रिय ठेवण्यासाठी सस्तन प्राण्यांमध्ये उत्क्रांती झाली असेल जेणे करून मेंदू याच भागांचा पुनर्वापर करून काही दुर्दैवी परिस्थिति ओढवून घेणार नाही. आता ही स्वप्न, समस्या सोडवण्यासाठी आहेत की आपला सराव करून घेण्यासाठी की आपली दृष्टी शाबूत ठेवण्यासाठी की थोडासा सराव, थोडासा समस्या सोडवण्यासाठी, थोडासा आपल्या दृष्टीसाठी. शास्त्रज्ञांना अजून तरी ठामपणे माहीत नाही यातील नक्की काय खरं आहे म्हणूनच अजूनही यावर प्रयोग सुरू आहेत. अगदी असं ही असू शकतं की स्वप्नाची निर्मिती एखाद्या विशेष कार्यासाठी झाली असेल पण कालांतराने ते इतर कार्यासही फायदेशीर होऊ लागले. झोपलेल्या मेंदूच्या कार्यामध्ये डोकावण्याचा प्रयत्न करणे ही मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्समधील सर्वात आव्हानात्मक समस्या आहे,
चला, स्वप्न पाहण्याच्या विज्ञानाचे संपूर्ण चित्र तयार करण्यासाठी स्वप्ने पाहू. पण एका वेळी एक स्वप्न.
स्वप्न पाहणारा: “मी नुकत्याच पाहिलेल्या स्वप्नावर तुमचा विश्वास बसणार नाही.”
-जान्हवी वामन
Originally written for Maharashtra Mandal Singapore - Ritugandha Varsha “Dream” Special Issue 2023
(महाराष्ट्र मंडळ सिंगापूर - ऋतुगंध वर्षा “स्वप्न” विशेषांक २०२३)
For original publication please see: https://mmsrutugandha.wordpress.com/2023/07/23/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ab%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4-%e0%a4%87%e0%a4%a4/

Poster Credit: Maharastra Mandal Singapore
Comments